
पंढरपूर (प्रतिनिधी)
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी आर्थिक तरतूद नसल्याने, या बजेटचा निषेध पंढरीत नोंदवण्यात आला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी येथील छत्रपती शिवाजी चौकात
रस्त्यावर उतरले. बजेटचा एकच दोष ! महाराष्ट्रावर रोष .. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
केंद्र सरकारने २०२४-२५चा अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला भरीव आर्थिक मदत देण्यात आली नाही.महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या मनातील रोष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरीत व्यक्त केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडे मारून जोरदार निषेध नोंदवण्यात आला,महाराष्ट्र राज्याला अशा प्रकारची वागणूक का देण्यात आली ? याबाबतचा जाव या आंदोलनातून विचारण्यात आला.
बजेटचा एकच रोष महाराष्ट्रावर इतका रोष ..
अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, दत्तात्रय माने, प्रताप पवार, अनिल सपताळ, बिपिन देवमारे, अर्जुन शेटे, विजय मोरे, आनंद कथले, सचिन आदमिले, सोमनाथ गोरे, महिला अध्यक्ष राजश्री ताड, सुनंदा उमाटे, सौदागर गायकवाड, अलका लोखंडे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.