पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये “स्ट्रक्चरल ऍनालिसिस अँड डिझाईन युजींग स्टॅड प्रो सॉफ्टवेअर” या विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर( प्रतिनिधी )
एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “स्ट्रक्चरल ऍनालिसिस अँड डिझाईन युजींग स्टॅड प्रो” या विषयावर “स्टॅड प्रो” हे सॉफ्टवेअर वापरुन स्टील आणि आर सी सी बिल्डिंगचे स्ट्रक्चरल एनालिसिस व डीजाईन तयार करण्याच्या संकल्पनेला, प्रात्यक्षिकासह समजून घेण्यासाठी साप्ताहिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांच्या प्रकल्पाधारीत शिक्षण या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली, समन्वयक प्रा. गणेश लकडे यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व कॅडडेस्क, बालाजीनगर, पुणे येथील संचालक श्री पराग देशमुख यांचे तज्ञ म्हणून मार्गदर्शन लाभले.
यावेळी विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रिअल शेड, पाण्याच्या टाक्या, टॉवर, आर सी सी इमारतींचे त्रिमितीय रचना करून त्यांचे ऍनालिसीसचे प्रात्यक्षिक केले, या ज्ञानाचा त्यांना भविष्यात खूप उपयोग होईल. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.