
पंढरपूर (प्रतिनिधी)
‘स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असणार्या सर्व बाबी उपलब्ध आहेत. त्यामुळे स्वेरीत जे उपक्रम सुरु आहेत, ते सर्वोत्तम आहेत. ट्रिपल पी.ई., विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे व बौद्धिक पातळीकडे स्वेरीतील प्रत्येक स्टाफचे लक्ष, काटेकोर शिक्षण व्यवस्था, अभ्यासक्रमाचे उत्तम नियोजन, प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष या कारणांमुळे आमच्या पाल्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडत आहे. एकूणच गुणवत्ता आणि शिस्त या सूत्रांवर स्वेरी भक्कमपणे उभी आहे.’ असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब नागटिळक यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित, डिप्लोमा फार्मसीमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्ष फार्मसीतील विद्यार्थी ,आणि त्यांच्या पालकांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून दादासाहेब नागटिळक आपला अनुभव सांगत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वेरी संचलित डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली, या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून दिनकर भोसले, तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.राणी लक्ष्मण पिसे हया उपस्थित होत्या.
दिपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात प्रा. सौरभ कौलगी यांनी डी.फार्मसीची सविस्तर माहिती दिली. यामध्ये महाविद्यालयात उपलब्ध सोयी-सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, रात्र अभ्यासिका वर्ग, तसेच शिक्षणासाठी संबंधित महत्वाच्या बाबी सांगितल्या. सोलार रुफ टॉप पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, वाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस सुविधा, वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच औषधांची निर्मिती कशी होते, हे पाहण्यासाठी थेट इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी फार्मसीशी निगडीत आवश्यक सुविधांची सविस्तर माहिती दिली. महिला पालक प्रतिनिधी सौ.राणी पिसे म्हणाल्या की, ‘स्वेरीमध्ये सर्व अभ्यास करून घेतला जातो. यामुळे अभ्यासासाठी इतरत्र जावे लागत नाही. त्यामुळे ‘अभ्यास कर गं बाई !’ असे आमच्या मुलींना म्हणावे लागत नाही. त्यामुळे आमचे पाल्य टॉपर होत आहेत.’ यावेळी दिनकर भोसले, सौ.गुरव यांच्यासह इतर पालकांनी आपले मनोगत मांडले. प्राचार्य प्रा. मांडवे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे पालकांनी पाल्याच्या करिअरच्या दृष्टीने महाविद्यालयाला वेळोवेळी सहकार्य करावे. आपला पाल्य कॉलेजमध्ये नियमित येतो का, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे, या सर्व बाबी पालकांनी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष येऊन संबंधित शिक्षकांशी भेटून आपल्या पाल्यांच्या उज्वल करिअर विषयी माहिती जाणून घ्यावी.’ असे आवाहन केले.
यावेळी काही पालकांनी बस वाहतूक व मेस याविषयी सूचना केल्या असता, प्राचार्य प्रा.मांडवे यांनी काही सूचना जागेवरच सोडवल्या , तर काही वरिष्ठ पातळीवर सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी अश्विनी नवनाथ बनसोडे, प्रथमेश अरुण घोलप, पल्लवी बजरंग हेगडे, महेक सलीम शेख, दिव्या सुभाष पवार, रोहिणी जगन्नाथ शिंदे, तन्वी जालिंदर फुगे, संतोष दशरथ पिसे, अभिषेक सुभाष चौगुले, सानिया जावेद मुजावर, प्राजक्ता एकनाथ माळी, शुभम बिराप्पा हिप्परकर, सानिका संजयकुमार गुरव, साक्षी उमाकांत झेंड, स्वाती उमेश काळे, प्रतिक्षा गणपत घोडके, सुमन नागनाथ खरे, शगुन महेश ओहोळ, निशा सतीश पुजारी, प्रणिता सुरेश खरात, भाग्यश्री बब्रुवान यादव, समृद्धी सतीश दीक्षित व प्रतिभा दिलीप मिसाळ या गुणवंत विद्यार्थ्यांचा परीक्षेत, प्रश्नमंजुषा, रांगोळी, वकृत्व, मॉडेल मेकींग, प्रोडक्ट डिटेलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरल्यामुळे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील सुमारे ३०० पालक मेळाव्यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली चव्हाण यांनी केले तर प्रा. ईशा शेटे यांनी आभार मानले.