
पंढरपूर (प्रतिनिधी)
मलेशिया , दुबई , फिनलँड या देशाबरोबरच भारताचा तिरंगा येथील एका युवकाच्या कामगिरीमुळे , श्रीलंकेत फडकवण्यात आला. महाराष्ट्र राज्यातून फक्त याच अवलियाची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. श्रीलंकेच्या कृषी मंत्र्यांनी ज्यांना सन्मानित केले,ते आहेत पंढरीतील समाजसेवक मुजमील कमलीवाले.
कमी वयात समाजसेवेचे वेड लागले. या वेडाने त्यांना राज्य आणि देशातील अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्यांची आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठीही निवड झाली. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा पंढरीतील पहिला युवक असावा.
आंतरराष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्काराने त्यांना श्रीलंकेत सन्मानित करण्यात आले. शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी ते विमानाने कोलंबो शहरातील बंडारनाइके मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल येथे पोहोचले. प्रवेशद्वारातच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर या हॉलमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात आला. या कार्यक्रमास विविध देशातील उद्योगपती, सेलिब्रिटी आणि मंत्री महोदय उपस्थित होते. ज्यांच्या कामगिरीमुळे देशाचा तिरंगा परदेशात फडकविला गेला, ते समाजसेवक मुजमिल कमलीवाले सबंध देशातील युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील , यात कोणतीही शंका नाही.