
पंढरपूर (पंढरपूर)
येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी, कार्निव्हल २के २५ चे आयोजन करण्यात आले होते. कार्निव्हल २ के२५ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सकाळी १०:१५ मिनिटानी ढोल पथकाने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्निव्हल २ के२५ या सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतीतील पोशाख तसेच महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केल्याची स्पर्धा आयोजित केली होती. दुपारच्या सत्रात स्त्री सुरक्षा, शिक्षणाचा बाजार, व आज्जी आणि नात याविषयावर सामाजिक बांधिलकीतून प्रबोधन लघु नाट्याच्या माध्यमातून केले. याशिवाय ढोल पथक, वेषभूषा, व्यक्तीमत्व स्पर्धा, शेलापागोटे, ग्रुप डान्स, वैयक्तिक गायन, वैयक्तिक डान्स वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून, विद्यार्थ्यांनी कला-कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी माढा विधानसभेचे नवनिर्वाचीत आ. अभिजित पाटील , प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच पंढरपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष सोमेश गानमोटे, रनर असोसिएशन पंढरपूरचे अध्यक्ष भारत ढोबळे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश कारंडे व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त घेण्यात आलेल्या क्रिकेट, खोखो, कबड्डी, चेस सहइतर अनेक स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुञसंचालनाची धुरा सांभाळली. कार्निव्हल २ के २५ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वृदं यांनी अतिशय शिस्तप्रिय मेहनत घेतल्यामुळे, खुप सुंदर असे परफॉर्मन्स सादर करण्यात विद्यार्थी यशस्वी झाले. त्यांच्या या परफॉर्मन्सचे उपस्थितांकडून भरपूर कौतुक झाले.