स्व.वसंतदादा काळे यांची २३ वी पुण्यतिथी साजरी

पंढरपूर (प्रतिनिधी)
चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व्.वसंत(दादा) काळे यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त् कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्यावतीने हरिभक्त पारायण ॲड.जयवंत महाराज बोधले यांचे शुभहस्ते आदरणीय दादांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र वाहुन किर्तन सोहळ्यास सुरुवात केली.
अज्ञानाची साथ सोडुन संताची संगत करा, संताची शिकवण, संताचे वर्तन, सतांचे आचरण अंगीकरणासाठी संस्कृती टिकविण्यासाठी संताची संगती करा, असे आपल्या मधुरवाणी किर्तनातुन सांगितले.
याप्रसंगी कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्यावतीने पुण्यतिथीचे विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम साजरे केले जातात. गतवर्षाप्रमाणे यावर्षीही ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांचे किर्तन व पुष्पवृष्टी सोहळा साजरा करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचेहस्ते जयवंत महाराज बोधले यांचा सत्कार करण्यात आला.
ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांचा सत्कार व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांचेहस्ते आणि ह.भ.प. वसंत महाराज कौलगे-पिराचीकुरोली, ह.भ.प. तात्या महाराज चौगुले-भाळवणी, ह.भ.प. शंकर महाराज चव्हाण-आढीव, ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे-सुपली, ह.भ.प. मधवआप्पा भिंगारे-नांदोरे, ह.भ.प.ॲङ मंगेश महाराज उपासे-पटवर्धनकुरोली यांचा सत्कार कारखान्याचे संचालकांचे हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रम विशेष परिश्रम घेतलेले नारायण शिंदे-देवडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. आवर्जन सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले धनश्री परिवाराचे जनक शिवाजीराव काळुंगेसर यांचाही सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी कारखान्याच्या संचालिका मालनबाई काळे, संचालक सर्वश्री परमेश्वर लामकाने, अमोल माने, राजाराम पाटील, गोरख जाधव, अरुण नलवडे, योगेश ताड, माजी संचालक राजाराम माने, पंचायत समिती सदस्य् सरेश देठे, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, व इतर मान्यवर, कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे व सर्व अधिकारी, कर्मचारी भाविक भक्त् मोठ्या संख्येने उपस्थित होते.