स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचा ‘अविष्कार-२०२४’ मध्ये यशस्वी सहभाग
मेडिसिन आणि फार्मसी गटात मिळविला दुसरा क्रमांक

पंढरपूर(प्रतिनिधी)
येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीने, पुन्हा एकदा संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात यशाची नवी उदाहरणे सादर केली आहेत.
विद्यापीठ स्तरीय अविष्कार स्पर्धेत स्वेरीच्या एका प्रकल्पाची निवड राज्यस्तरीय ‘अविष्कार २०२४’ साठी झाली आहे. या यशाबद्दल स्वेरीतील संशोधकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. ‘स्वेरी’ हे संशोधन आणि नवोपक्रमशील संस्कृतीचे प्रतीक आहे, हे आता सर्वश्रुत झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार २०२४’ ही संशोधन स्पर्धा सोलापूर मधील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित केली होती. या स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ३०हून अधिक महाविद्यालयातील ४१४ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग
होता.
या स्पर्धेचे संयोजन डॉ. रश्मी दीक्षित आणि डॉ. सतीश काशीद यांनी केले होते. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करणारी ठरली. यामध्ये स्वेरीच्या एका प्रकल्पाने उल्लेखनीय कामगिरी केली. स्वेरी फार्मसी विभागात बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या अर्चना वसंत कोंगारी यांनी ‘मेडिसिन आणि फार्मसी’ गटात दुसरा क्रमांक मिळवला. त्यांना फार्मसीचे ‘अविष्कार २०२४’ चे समन्वयक डॉ. व्ही. व्ही. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
यावेळी प्र. कुलगुरू डॉ. दामा म्हणाले की, ‘अविष्कार मध्ये विजेतेपद मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयारी करावी ,आणि त्यात देखील यश खेचून आणावे असे सांगून उपयुक्त मार्गदर्शन केले. सन २००६ साली महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस एम. कृष्णा यांच्या पुढाकाराने विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार’ ही संशोधनात्मक स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणांना चालना देणे, त्यांच्यामधील संशोधनवृती जोपासणे, नाविन्यपूर्ण विचारासाठी प्रोत्साहित करणे आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवणे, यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरली आहे.
विद्यापीठ स्तरावरील या स्पर्धेत प्युअर सायन्सेस, कृषी, ह्युमॅनिटीज, इंजिनिअरिंग, फार्मसी अशा विविध श्रेणींमध्ये युजी, पीजी आणि पीपीजी स्तरावरील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वेरीच्या फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनाचा गौरव सर्व स्तरातून करण्यात येत आहे. विदयार्थ्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मिळविलेले यश महाविद्यालयातील सशोधन आणि नवकल्पना वाढवण्याच्या कटिबद्धतेचे परिमाण आहे , तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि ज्ञानाचा शोध घेण्यासाठी प्रेरणा देणारे आहे, हे मात्र निश्चित. यशस्वी संशोधक विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक यांनी अर्चना कोंगारी यांचे अभिनदन केले.