राजकियसामाजिक

काळे कुटुंबीयांचे योगदान पंढरपूर तालुक्यासाठी अनमोल

त्यांनी उभारलेल्या संस्थांना काही कमी पडू देणार नाही - दत्तात्रय मामा भरणे

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्याच्या विकासामध्ये वसंतदादा काळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेले योगदान अनमोल असून, वसंतदादांनी उभारलेल्या व कल्याणराव काळे पुढं घेऊन जात असलेल्या शिक्षण संस्थांना काही कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केले. ते वाडीकुरोली ता. पंढरपूर येथे आयोजित सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या ८१ व्या जयंती समारंभात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे हे होते.
पुढे बोलताना भरणे म्हणाले की मेहनत व त्यागाशिवाय यश मिळत नसून प्रबळ इच्छाशक्ती ठेवली तर संकटातून मार्ग निघतो हे वसंतदादांच्या कार्यातून आपल्याला शिकण्यास मिळते. शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधताना विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मनामध्ये न्यूनगंड न बाळगता उच्च ध्येय ठेवून प्रयत्न करावा, आई-वडिलांचा मान राखत जीवनात यशस्वी व्हावे असे सांगितले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे म्हणाले की, गोरगरीब कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकून मोठ्या पदावरती पोहोचावं, हे सहकार शिरोमणी वसंतदादांनी पाहिलेलं स्वप्न आज शैक्षणिक संकुलात शिक्षण घेतलेली मुलं पूर्ण करत आहेत, याचा मनोमन आनंद होत आहे. सहकार शिरोमणी दादांनी घालून दिलेल्या आदर्शावर भविष्यकालीन वाटचाल विद्यार्थ्यांनी उज्वल करावी असे सांगितले

या कार्यक्रमास पुणे जिल्हा
या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश पाटील, कृषिराज शुगरचे चेअरमन गणेश पाटील, सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे, निशिगंधा बँकेचे चेअरमन राजेंद्र जाधव, यशवंत संस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक ,पंढरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सहकार शिरोमणी परिवारातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बाळासाहेब काळे गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक दत्तात्रय यलमार यांनी मानले.

वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सत्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close