राज ठाकरे यांच्या मंगळवेढा दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले
मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारासाठी आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मंगळवेढा दौरा मनसेसाठी मोठा आशादायी ठरला. मंगळवेढा मतदार संघाबाबत त्यांनी केलेल्या आश्वासक वक्तव्याने, उपस्थित नागरिक भारावून गेले. त्यांनी केलेल्या आशादायी वक्तव्यामुळे येथील बेरोजगार युवक, शेतकरी आणि इतर नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. एकूणच राज ठाकरे यांच्या दौऱ्याने मंगळवेढा तालुक्यास ढवळून काढले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणा पलीकडचे नेतृत्व आहे. सध्याच्या राजकारण्यांवर त्यांनी तोफ डागली. विकासाच्या नावाखाली हे लोक, आपली घरे भरतात, पुणे आणि मुंबईसारख्या शहरात जाऊन घरे थाटतात. त्यांचा आणि नागरिकांचा काहीही संबंध राहत नाही. पुन्हा निवडणुकीच्या वेळी नागरिकांसमोर येण्यास रिकामे होतात.
मंगळवेढा तालुक्यात वाढलेली बेरोजगारी संपवण्याचे धाडस फक्त आणि फक्त मनसेच करू शकते. येथील तरुण बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याचे सामर्थ्य फक्त मनसेकडेच आहे. तालुक्याची कायम दुष्काळी तालुका अशी ओळख ,अनेक वर्षापासून आहे. अगोदरच्या राजकारण्यांनी काय काम केले, हे आपण त्यांना कधी विचारणार ? राजकारण्यांना जाब विचारण्याचे धाडस जोपर्यंत आपण करत नाही , तोपर्यंत हे सर्व असेच चालत राहणार, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
कोणत्याही नागरिकाला व्यवस्थित जगण्यासाठी हाताला काम, कामाला दाम,शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था इत्यादी गोष्टींची गरज असते. गेल्या ७५ वर्षातnयेथील लोकप्रतिनिधींनी काय केले ?असा सावल त्यांनी उपस्थित नागरिकांना विचारला. राज ठाकरे यांनी येथे कोणत्या पद्धतीने विकास होऊ शकतो, यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती प्रबळ असावी लागते, याबाबतचे विचार मांडले. यासाठी मनसेला निवडून द्या. मग पहा विकास कसा असतो ते .असे सांगून मनसेला विजयी करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांचा मंगळवेढा दौरा मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांची उमेदवारी उजळवणारा ठरला. मंगळवेढा तालुक्यातील मतदारांचे डोळे आता दिलीप धोत्रे यांच्याकडे लागले असून, त्यांची झेप आता विजयाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे.