
पंढरपूर (प्रतिनिधी)
कर्तुत्व आणि दातृत्वाच्या जीवावर , महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीतच नाव मिळवलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री , आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण सम्राट भाऊसाहेब रुपनर यांचा सन्मान केला. या सन्मानाची छाप अख्या जिल्ह्यावर पडली.
सांगोला येथे गुरुवार दि.१० एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आणि त्यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण तसेच लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी विधानसभेचे उपसभापती अण्णा दादू बनसोडे, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई , राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे, यांच्यासह आ. अवताडे , आ.राजू खरे ,आ.बाबासाहेब देशमुख , माजी आमदार दीपक आबा साळुंखे , शहाजी बापू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सांगोला तालुक्यात फेबटेक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या संस्थेस स्वायत्त दर्जा मिळाला याबद्दल फॅबटेकचे चेअरमन आणि विश्वस्त शिक्षण सम्राट उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांचा गौरवही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करण्यात आला. २०११ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज बरोबरच फार्मसी , डिग्री , डिप्लोमा आणि सीबीएसइ माध्यमाचे पब्लिक स्कूलही कार्यरत आहे. नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने या सेंटरला स्वायत्तता बहाल केली. यामुळे या कॅम्पसचे प्रमुख डॉ. भाऊसाहेब रुपनर यांचा सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, जिल्ह्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे , ज्येष्ठ नेते झपके सर आधी मान्यवर उपस्थित होते.