
सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा आज सायं. ७ वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, शिवतीर्थावर होणार आहे. मनसेकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली
देशाचा विकास होईल, असा आशावाद व्यक्त करीत त्यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून महायुतीच्या उमेदवारांसाठी
घेऊन प्रचार केला जात आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार
रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले आहे. रविवार दि.२८
एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता ही सभा शिवतीर्थावर घेण्यात येणार आहे. यासाठी शिवतीर्थाची सजावट करण्यात आली आहे. या सभेसाठी महायुतीचे दोन्ही उमेदवार, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह, मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.