राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांचे पारडे जड
पंढरपुरातील दहा नगरसेवकांनी केला पाठिंबा जाहीर

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांचे पारडे वरचेवर जड होत चालले असून, काँग्रेस पदाधिकाऱ्यानंतर आता पंढरपूर मधील दहा नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांची विजयाकडे कूच होत असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे.
पंढरपूर शहरातील या दहा नगरसेवकांनी खा. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दिला आहे. खा. अमोल कोल्हे यांच्या हस्ते या नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला असून, उमेदवार अनिल सावंत यांनी हातात हात घालून काम करण्याचे वचन या नगरसेवकांना दिले आहे.
पंढरपूर शहरातील माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रताप गंगेकर, संतोष मेहतराव, समाजसेवक अर्जुन पवार, सामाजिक कार्यकर्ते आणि आरपीआय शहराध्यक्ष समाधान लोखंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज गंगेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब आसबे, राजश्री गंगेकर, संतोष नेहतराव, सुरेश नेहतराव, बाळासाहेब नेहतराव आदींसह दहा नगरसेवकांनी अनिल सावंत यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे.