आषाढी यात्रेत तीन हजार सदोष पाण्याच्या बाटल्या जप्त
सोलापूर अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई काय म्हणते

पंढरपूर (प्रतिनिधी)
सोमवार दि. १५ जुलै रोजी, पंढरीत अन्न व औषध प्रशासनाकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून,लेबल दोष असणाऱ्या तीन हजार पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. उमेश भुसे यांनी केली असून, या कारवाईमुळे भेसळ माफीयांचे धाबे दणाणले आहेत.
पंढरीत आषाढी यात्रा सुरू असून, या अनुषंगाने सोलापूर अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. उमेश भुसे हे तपासणी करीत होते. स्मार्ट कंपनीच्या बाटलीबंद पाणी बॉटलवर लेबल दोष असल्याचे आढळून आले. यानंतर भुसे हे तात्काळ
मे. पृथ्वीराज इंटरप्राईजेस मु. पो. लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा या कंपनीस भेट देण्यासाठी गेले. या कंपनीची तपासणी केली असता, सदर कंपनी ही विनापरवाना बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले.
यानंतर डॉ. उमेश भुसे यांनी स्मार्ट पॅकेजड ड्रिंकिंग वॉटरच्या अन्नाचा नमुना विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठवण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.