
पंढरपूर(प्रतिनिधी)
नुकताच शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सोलापूर येथील बी.एफ. दमानी विद्यामंदिर येथील विद्यार्थी तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्यांने एसएससी परीक्षेमध्ये ९८.६० इतके मार्क घेऊन बी.एफ.दमाणी विद्यामंदिर सोलापूर या शाळेच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा रोवला आहे
तन्मय बाळासाहेब जाधव हा विद्यार्थी या शाळेमध्ये इयत्ता पहिल्या वर्गापासून अग्रक्रमांक मिळवत होता. त्यांने बी.एफ.दमाणी शाळेतील शिक्षकांच्या कष्टाचे व त्यांच्या मार्गदर्शनाचे चीज केले. तन्मय जाधव याला शाळेतील मुख्याध्यापक तसेच त्याचे सर्व विषयाचे शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळेच व अभ्यासामध्ये सातत्य राखल्यामुळे हे त्याला यश मिळवता आले. असे तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्यांने सांगितले.
तन्मयची आई या शिक्षिका असून तन्मयचे वडील बाळासाहेब जाधव हे देखील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे दुःखद निधन कोरोना काळात झाले. अतिशय लहान वयामध्ये पितृछत्र हरपल्यामुळे तन्मय जाधवची आई श्रीमती संध्या बाळासाहेब जाधव यांनी आपले सर्व दुःख बाजूला ठेवून तन्मय याची शैक्षणिक प्रगती कशी होईल, याकडे लक्ष दिल्यामुळे त्यांनी आज हे यश प्राप्त केले आहे.
तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याचे बीएफ दमानी विद्यामंदिर सोलापूर या ठिकाणी त्याचा सत्कार करून व पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व शिक्षक वर्गानी त्याला शुभेच्छा दिल्या. पितृछत्र हरपल्यानंतर देखील नैराश्याला बाजूला करून,, मोठ्या जिद्दीने तन्मय बाळासाहेब जाधव यांनी एसएससी चा अभ्यास करून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.