
पंढरपूर (प्रतिनिधी)
कोर्टी, तालुका पंढरपूर येथील एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनियरींग विभागात, शिक्षण घेतलेले महेश जगन्नाथ म्हेत्रे यांची महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनियर पदी निवड झाली.
महेश म्हेत्रे यांच्या निवडीबददल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे प्लेसमेंट ऑफीसर डॉ. समीर कटेकर, डॉ.कोंडरु, डॉ.पिसे, डॉ.कदम,डॉ.गोडबोले, डॉ.मुलाणी, डॉ.एस.एस.कुलकर्णी, डॉ.पिंगळे, डॉ.संपत देशमुख, डॉ.निकम, डॉ.आराध्ये, डॉ.गंधारे, डॉ.कोळी, डॉ.पवार, डॉ.गानमोटे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.