राजकिय

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा आ.राम सातपुते यांना पाठिंबा

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला एकमताने निर्णय

सन २०१४ पासून भाजप सरकार या देशांमध्ये आल्यानंतर, अनुसूचित जाती व जमातीसाठी वेगळी योजना राबविण्यात आली. पूर्वी मागासवर्गीयांना कुठल्याही बँकेत गेल्यानंतर एक लाख रुपये लोन घेण्यासाठी सुद्धा त्यांना घर तारण आहे का ? जागा तारण आहे का ? अशा गोष्टींची विचारणा करण्यात येत होती. त्याच्यानंतर जेव्हा डिक्कीची स्थापना झाली त्यानंतर, मागासवर्गीयांसाठी उद्योजक घडविण्याचे काम सुरु झाले. ह्या देशामध्ये मागासवर्गीयांसाठी उद्योग करायचा असेल तर पैशाची गरज असताना कुठल्या बँकांची सेक्युरिटी नसताना बँका लोन देत नव्हत्या, म्हणून स्टैंड अप इंडिया योजना ही २०१७ साली अमलात आणण्यात आली. हे फक्त आणि एस्सी-एसटी ह्या उद्योगांसाठीच असून, मागासवर्गीय हे नोकरी मागणारे नसून नोकरी देणार आहेत हा उद्देश आहे. म्हणून त्या स्टैंडर्ड अंतर्गत एस्सी-एसटी साठी एक कोटी रुपयांची व्यवसायासाठी, एक कोटी रुपयांची कोणतेही तारण व जामीनदार न घेता, या योजनेची बँकांमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे.

पुन्हा काही काळानंतर २०२० मध्ये आम्ही मोदी सरकारने विनंती केली की, देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त देशभरामध्ये १ लाख २५ हजार, राष्ट्रीयीकृत बँकाना एका वर्षामध्ये फक्त एकाला एक कोटी फायनान्स करून, त्याला उद्योजक बनवायचे टार्गेट देण्यात आले. मोदी सरकारने सर्व बँकांना रिझर्व बँकेकडून ही नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली, तेव्हापासून सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी अनुसूचित जाती जमातीसाठी एक एक उद्योजक व्यापार करण्यासाठी एक कोटीचा फायनान्स करण्यात आले, असे देशभरामध्ये सध्याचे स्थितीमध्ये स्टैंडअप इंडिया या योजनेअंतर्गत अडीच लाख मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे उद्योजक तयार झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना अंतर्गत १५ टक्के सबसिडी देण्यात आली. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत लोन अमाऊंटच्या २५ टक्के सबसिडी देण्यात आली.

हे आतापर्यंत कोणत्याही सरकारने आत्तापर्यंत केले नव्हते. फक्त आणि फक्त मोदी सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली. यासाठी म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चे पदाधिकारी व सोलापूर जिल्ह्यातील सदस्यांच्या वतीने, सोलापूर लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत.

ही योजना आणण्यासाठी डीक्की संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवत आहोत.
म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. राम सातपुते संपूर्ण बहुमताने निवडून येतील, अशी हमी देण्यात आली.

  • या पत्रकार परिषदेस डीक्कीचे जिल्हा समन्वयक सिद्धाराम चाबुकस्वार, विजय माने, दत्तात्रेय वाघमारे, आशीष धोलराव, डोंगरेश चाबुकस्वार आदि उपस्थित होते.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close