राजकिय

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ घेण्याचा एकमुखी ठराव

पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक ठरली वादळी

पंढरपूर (प्रतिनिधी)

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एकीचे दर्शन घडविणारी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक शुक्रवारी पंढरीत पार पडली. पंढरपूर विधानसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला पूर्ववत मिळावी, असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. हा ठराव काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती, या बैठकीचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडून देण्यात आली. या बैठकीस तालुक्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ही बैठक पंढरपूर शहरातील सु.रा. परिचारक पतसंस्थेत मोठ्या थाटात पार पडली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ मागील काळात काँग्रेसकडे होता. हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या वाट्याला मिळावा, अशी मागणी अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष अशपाक सय्यद, तसेच काँग्रेस नेते तानाजी रणदिवे यांनी केली. यावर या बैठकीत मोठी चर्चा झाली. अखेर याबाबतचा ठराव एकमुखी
करण्यात आला.

काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींसह इतर विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. पंढरपूर विधानसभा मतदार संघाबाबतचा हा ठराव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडून देण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा प्रणिती शिंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीची व फलटण सेलची आढावा बैठक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तर पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीस ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष अशपाक सय्यद, माथाडी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे, ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव, किसान सेलचे तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण जवळेकर, तानाजी रणदिवे, मल्हारी फाळके,प्रकाश साठे, नामदेव साळुंखे, पंढरपूर मंगळवेढा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष बलदेव शिकलकर, मालवाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तात्या फडतरे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष बाळासाहेब आसबे, समाजसेवक शिवाजी धोत्रे, मिलिंद आडवळकर पंढरपूर शहर उपाध्यक्ष मनोज गावंधरे दिलीप कोरके, संजय थिटे, अशोक अवताडे, पिंटू आडगळे, दत्तात्रय शेरखाने हनुमंत नाईकनवरे, भैय्या जमदाडे, समाधान गायकवाड,राहुल आडगळे, तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close