राजकिय

तळपती तुतारी भालके यांच्या हातात ?

शरद पवारांची भूमिका वेट अँड वॉच ...

पंढरपूर (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राजकीय ज्वर वाढू लागला आहे. राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांच्याकडे राजकीय मंडळींची रीघ लागली आहे. नुकतेच बी.आर.एस. चे नेते भगीरथ भालके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या ते प्रभावशाली नेते आहेत. भगीरथ भालके यांची त्यांनी पद्धतशीर बोळवण करून माघारी पाठवले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. निवडणुकीत त्यांच्या हातून काही चुका झाल्या. आणि राष्ट्रवादीला ही जागा गमवावी लागली. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, काही राजकीय सभांमधून बोलून दाखवत नाराजी व्यक्त केली होती. या पराभवानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, आणि त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी परिचारक गटाबरोबर हात मिळवणी केली, आणि दामाजी कारखान्याची निवडणूक जिंकली. या निवडणुकीनंतर मात्र दामाजी कारखान्याचा चेअरमन परिचारक गटाचा झाला. स्व. आमदार भारत भालके गटाचे नाव हळूहळू पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकारणात मागे पडले. यानंतर भगीरथ भालके यांनी बी.आर.एस. पक्षात प्रवेश केला. काही दिवसातच तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आणि याच वेळी भगीरथ भालके यांचा बी आर एस पक्षाशी असलेला संबंध कमी झाला.

लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी बी.आर.एस पक्षाला न जूमानता, महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला.
महाविकास आघाडीच्या पाठीशी असलेल्या मतदारांच्या जोरामुळे, प्रणिती शिंदे यांचा मोठा विजय झाला. पंढरपूरमध्ये त्यांनी घेतलेल्या कृतज्ञता
मेळाव्यातही, भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी खा. प्रणिती शिंदे यांच्या समोर गोंधळ घातला. हेच भगीरथ भालके आता राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन आले आहेत. ही भेट होताच, त्यांच्या समर्थकांनी आता कामाला लागा, अशी आरोळी ठोकण्यास सुरुवात केली आहे.

तसे पाहता पंढरपूर मंगळवेढा हा विधानसभा मतदारसंघ कायमच महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिला आहे. राज्याच्या राजकारणात आता राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांचा मोठा बोलबाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचे आखाडे बांधण्यास सुरुवात केली आहे. राजकीय परिस्थिती अनुकूल असताना,
या मतदारसंघात शरद पवार मोठा मोहरा गळाला लागतो काय ? याची चाचपणी करत असल्याचे वृत्त आहे. याशिवाय तालुक्यातील अनेक मोठी नेते मंडळी त्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात तुतारी नेमकी कोणाच्या हाती दिली जाणार ? हा प्रश्न म्हणावा तितका सोपा नाही. पंढरपूर मंगळवेढ्याच्या निवडणुकीसाठी पवारांनी मागेच अभिजीत पाटील यांचे नाव जाहीर केले होते. आता ते महायुतीमध्ये आहेत. या निवडणुकीसाठी खुद्द शरद पवार मोठी रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत. याची उकल थोड्याच अवधीत होणार असल्याचे वृत्त आहे.

भगीरथ भालके आणि त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन आले.सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा जो उमेदवार दिला जाईल, त्याच्या पाठीशी मोठी ताकत उभी राहणार आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडून भालके यांना उमेदवारी दिली जाईल, असे वातावरण नक्कीच नाही. माढा लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडण्यासाठी जे राजकीय वातावरण होते , तेच वातावरण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचा उमेदवार निवडताना होणार आहे. शरद पवार यांच्याकडे

या मतदार संघासाठी अनेक दिग्गज मंडळींनी फिल्डिंग लावली असल्याचे राजकीय चित्र सध्या तरी आहे. यामुळे भगीरथ भालके यांच्या उमेदवारीबाबत सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका राष्ट्रवादीच्या गोटात असल्याचे दिसून येत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close