
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हाहाकार माजवला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची शेती पिके उध्वस्त झाली. या पिकांचा तात्काळ पंचनामा करावा, आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पंढरपूर तालुका युवा सेनेकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांना सोमवारी देण्यात आले.
पंढरपूर तालुक्यात पाच दिवसात दोनदा वादळी वाऱ्यासह पाऊस धडकला. यामध्ये केळी पिकासह अनेक शेती पिकांचे नुकसान झाले. अगोदरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसताना, दुहेरी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. यासाठी पंढरपूर तालुका युवा सेनेकडून
तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुरांडे, युवा सेना पंढरपूर तालुका उपाध्यक्ष समाधान गोरे, प्रणित पवार, सरपंच शंकर सुरवसे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक दिनकर चव्हाण, शिवसेना शाखा अध्यक्ष औदुंबर चव्हाण, शाखा उपाध्यक्ष गणेश जाधव, शिवसेना शाखा सचिव विलास कांबळे, आढीव सोसायटीचे संचालक दत्ताभाऊ अंबुरे, भैरवनाथ को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे संचालक व समाजसेवक प्रशांत असावे तथा वैष्णवी दूध संकलन केंद्राचे मॅनेजर व समाजसेवेची ओढ असणारे योगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.