
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील गुजराती, रुखी समाजाच्या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत दहावी आणि बारावीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ. अमर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जान आणली.
या कार्यक्रमास गुजराती समाजाचे अध्यक्ष गुरु दोडिया, उपाध्यक्ष काशिनाथ सोलंकी,माजी अध्यक्ष किसन मेहडा, आदित्य मेहडा, सुरेश सोलंकी, गोकुळ वाघेला आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर शहरातील संत पेठ, गुजराती कॉलनी
येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कु. तुलसी यशवंत वाघेला, यशोदा गोकुळ वाघेला, रोनक छगन पूरबीया, वैशाली विक्रम सोलंकी, मानसी अंबादास गोयल या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष गुरु दोडिया, काशिनाथ सोलंकी, प्रा. कैलास मेहडा, गुजराती रुखी समाज शैक्षणिक कमिटीचे अध्यक्ष योगेश मेहडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आपणही डॉक्टर, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी का होऊ शकत नाही ? याबाबत आपले ध्येय धोरण कशा पद्धतीने असावे, आपले आई-वडील साफसफाईचे काम करून आपल्याला शिक्षण देत आहेत, या शिक्षणाचे चीज व्हायला पाहिजे, म्हणून आपण मोठे स्वप्न बघा. मेहनत आणि परिश्रम घ्या. आपण ही मोठे अधिकारी होऊ शकतो. अनेक थोर महापुरुषांच्या चरित्रांची उदाहरणे देऊन, प्रा. अमर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन मेहडा, अनिल मेहडा, हरीश दोडिया यांनी परिश्रम घेतले. यावेळी कॉलनीतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गोयल यांनी केले. प्रास्ताविक जितेश वाघेला यांनी, तर आभार प्रदर्शन दीपक वाघेला यांनी केले.