
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरीच्या लोकां नाही अभिमान,पाया पडे जन एकमेका. पंढरपूरच्या लोकांची खासियत वेगळी आहे. विठुरायाच्या नगरीत असलेल्या लोकांना कोणताही अभिमान नसतो, याची साक्ष संभाजी शिंदे आणि
खा. अनिल देसाई यांच्या मुंबईतील भेटीने दिली आहे.
पंढरपूरचे संभाजी शिंदे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. याशिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे ते क्रियाशील सदस्य आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यत्वामुळे त्यांच्या राज्यात अनेक ओळखी आहेत. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभेच्या रणांगणात उद्धव ठाकरे शिवसेनेने बाजी मारली. शिवसेनेचे नऊ खासदार लोकसभेत गेले. पंढरपूरचे संभाजी शिंदे यांनी लागलीच मुंबईला प्रयाण केले. मुंबई दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून
विजय मिळवलेल्या खा. अनिल देसाई यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची दैनंदिनी, दिनदर्शिका आणि उपरणे देऊन देसाई यांचा सन्मान केला. या भेटीमुळे खा. अनिल देसाई जाम खुश झाले. पंढरीचा विठुरायाच भेटीला आल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरले.
संभाजी शिंदे यांच्या रूपाने विठुरायाचा आशीर्वाद आपणास मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्यासह अजय इत्यादी मान्यवर उपस्थित होते.