
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरालगत असणारे लक्ष्मी टाकळी हे गाव पंढरपूरचे उपनगरच आहे. पंढरपूर शहरात भरणाऱ्या चारही यात्रांमध्ये या उपनगराचा मोठा सहभाग असतो. यंदाच्या आषाढी वारीत मात्र लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीस सामावून घेण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या निधी नियोजनात या ग्रामपंचायतीस सामावून घेण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओव्हाळ यांनी, गुरुवारी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीस भेट दिली. आषाढी यात्रेसाठी मंजूर करण्यात आलेला निधी ग्रामपंचायतच्या खात्यात वर्ग करण्यात आला. यावेळी त्यांनी संपूर्ण लक्ष्मी टाकळी गावची पाहणी केली. ग्रामपंचायतीने केलेल्या तलावाची आणि बंधाऱ्याची पाहणी करून,
येथील ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचा कारभार सुधारला तो शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश
साठे यांच्या प्रयत्नामुळे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली. महेश साठे
यांनी या निवडणुकीत स्वबळावर घरातील चार सदस्य निवडून आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असणाऱ्या महेश साठे यांच्यावर मुख्यमंत्री यांची अधिकच मर्जी बसली. त्यांच्याच प्रयत्नामुळे यावर्षी आषाढी यात्रेच्या निधी नियोजनात
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीला सामावून घेण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओव्हाळ यांनी
या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे सांगितले याचवेळी ग्रामपंचायतच्या सदस्यांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते.