जबाबदारी वाढली ! छत्रपतींच्या विचारावर चालण्याची–नागेश फाटे
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता समारंभात नागेश फाटे सन्मानित

पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यभर करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाल्याबद्दल, राष्ट्रवादीच्या व्यापार आणि उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे छत्रपतींच्या विचारावर चालत राहण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या सांगता समारंभास राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, प्राध्याध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. निलेश लंके, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आ. सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने, राज्यात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सबंध राज्यभर या शिवस्वराज्य यात्रेने धुमाकूळ उडवून दिला.या यात्रेचा सांगता समारंभ, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी व्यापार आणि उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. छत्रपतींच्या विचारावर चालण्याची, जनतेचे हित कायम ध्यानात ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर वाढली आहे. छत्रपतींचे विचार याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा प्रसार करण्याचे भाग्य मला लाभले याचा आपणास अभिमान असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.