राजकियसामाजिक

आगामी काळात शरद पवार सांगतील तेच काम करणार

अनिल सावंत यांची शरद पवार यांच्याशी नाळ घट्ट जुळली

पंढरपूर (प्रतिनिधी)

भैरवनाथ शुगर लवंगीचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत आणि राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची नाळ घट्ट जुळल्याचे चित्र सध्या दिसत असून, आगामी काळात शरद पवार संगतील ते काम आपण करणार असल्याची प्रतिक्रिया अनिल सावंत यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळो अथवा न मिळो, मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांसाठी काम करतच राहणार , असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ते मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या महिलांच्या कार्यक्रमात बोलत होते.

भैरवनाथ शुगरचे व्हॉइस चेअरमन अनिल सावंत यांचे या कार्यक्रमात महिलांकडून जंगी स्वागत करण्यात आले. गेल्या पंधरा वर्षापासून माझे आणि तुमचे दुःख एकच आहे. येथील महिलेच्या
खांद्यावरील हंडा उतरवल्याशिवाय आपण गप्प राहणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास सुमारे साडेपाच हजार महिलांनी आपला सहभाग नोंदवला. मंगळवेढा तालुक्यात यापूर्वी चार ठिकाणी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मिळणारा प्रतिसाद पाहून, पुन्हा पाठखळ या ठिकाणी
हा कार्यक्रम घेण्यात आला.

मंगळवेढा तालुक्यावर माझे विशेष प्रेम आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. परंतु उमेदवारी मिळो अथवा न मिळो, येथील महिला, युवक यांच्यासाठी आपले काम असेच सुरू राहणार
आहे. राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार सांगतील ते काम यापुढील काळात करत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अनिल सावंत हे शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. मंगळवेढा तालुक्यात भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून त्यांचे काम चालू आहे. परंतु ते काही दिवसांपासून राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारीची मागणी ही केली आहे. उमेदवारी मिळो अथवा न मिळो शरद पवार सांगतील एक काम करत राहणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावरून अनिल सावंत यांची नाळ शरद पवार यांच्याशी चांगलीच जुळण्याचे दिसत आहे.

खेळ पैठणीचा या कार्यक्रमात विजेत्या महिलांना एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशीन, मिक्सर यासारखी बक्षिसे देण्यात आली. महिलांनी या कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close