
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरमधील समाजसेवक मुजम्मिल कमलीवाले यांना यंदाचा इंडियन टॅलेंट अवार्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे टॅलेंट कट्टा यांनी आयोजित केलेला हा पुरस्कार समारंभ येथील पत्रकार भवनात शनिवारी मोठ्या दिमाखात पार पडला.
राज्यातील पुणे टॅलेंट कट्टा हा नामांकित ग्रुप आहे.
या ग्रुपच्या वतीने दरवर्षीच समाजातील प्रभावशाली व्यक्तींना गौरवण्यात येते. पंढरपूरमधील समाजसेवक मुजमील कमलीवाले यांना यंदाचा इंडियन टॅलेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
मानपत्र, सन्मान चिन्ह, गौरव पदक आणि फेटा
बांधून, कमलीवाले यांना सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्रसिंग वालिया आणि कृषी आयुक्तालयाचे तंत्र अधिकारी अनिल अयाचित, या उभयतांच्या शुभहस्ते हा पुरस्कार कमलीवाले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सभागृहातील उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा गजर केला. याप्रसंगी पुणे टॅलेंट कट्टा ग्रुपचे अध्यक्ष दादाराव जाधव, युवा उद्योजक नितीन धवणे यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.