
विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, दोन दिवसांपासून चर्चेत आले आहेत. विठ्ठल साखर कारखान्याचा ताबा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घेतला. याचे पडसाद संचालक मंडळासह, शेतकऱ्यांवरही उमटले आहेत. परंतु या कारवाईने अभिजीत पाटील यांच्या राजकीय स्वप्नांचा चुराडाच झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून महायुतीच्या नेतेमंडळींमध्ये खलबते सुरू होती. म्हणे दोन नेत्यांनी त्यांना भाजपमध्ये घेण्यास मोठा विरोध दर्शविला. यामुळेच त्यांनी बुधवारी सायंकाळी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
या दिवशी कारखाना कार्यस्थळावर शेकडो सभासद गोळा करण्यात आले. या सभासदांसमोर
अभिजीत पाटील यांनी कारखान्यासमोरील अडचणी मांडल्या. या सभेस उपस्थित असलेल्या
खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना कारखान्याच्या समस्येबाबत सांगितले. हा कारखाना पूर्वपदावर आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असे सूचित केले. आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला.
हे सर्व घडत असताना, अभजित पाटील यांनीकारखान्यास प्रधान्य दिले.ते भाजपमध्ये गेले असते तर, आमदारकीसाठी अडचणी आल्या नसत्या, मात्र भाजपमधील दोन नेत्यांनी विरोध केला आणि त्यांच्या आमदारकीचा मार्ग खुंटला.
विठ्ठल कारखाण्यावरील कारवाईमागे ,कोणाचा हात आसेल अथवा नसेल, परंतु आमदारकीमागे निश्चितच मोठा हात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अभिजीत पाटील यांची आमदारकी तर या कारखान्याला आडवी आली नाही काय ? असा प्रश्न विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या
सभासदांसमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही.
विठ्ठल कारखान्याचा सभासद वर्ग कायमच स्वावलंबी राहिला आहे. मात्र या सभासद वर्गाने आजवर अनेक आमदार पंढरपूर तालुक्यास दिले आहेत . कारखान्याच्या जीवावर आमदार झालेले अनेक वेळा सभासदांनी पाहिले आहेत, परंतु आमदारकीसाठी कारखान्यावर गंडांतर येण्याची पहिलीच वेळ विठ्ठल कारखान्यावर आली आहे. याला राजकीय दिवस कारणीभूत असो, की विरोधी गटाची राजकीय मुसद्देगिरी ? हे येणारा पुढील काळच
सांगणार आहे.