
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरालगत असणारे लक्ष्मी टाकळी उपनगर. या उपनगरातील विविध रस्त्यांच्या विकासाकामांचे उद्घाटन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यांच्या विकास कामांसाठी त्यांच्याच फंडातून निधी देण्यात आला आहे. महेश साठे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्यामुळे,
त्यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत.
मूळ शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळे होत मुख्यमंत्रीपद पटकावले. आणि पंढरपूर तालुक्यातील महेश साठे यांचा राजकारणात पुन्हा उदय झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच जाहीर सभा महेश शिंदे यांच्या लक्ष्मी टाकळी येथील विठाई सदन मध्ये घेण्यात आली. आणि त्यांची गाडी सुसाट सुटली.
पंढरपूर तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्यांसाठी
त्यांनी निधी आणून दिला. याचवेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. यामुळे महेश साठे यांचे काम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नजरेत बसले. सोलापूर जिल्हा नियोजन मंडळात त्यांची वर्णी लागली. याही संधीचे सोने करण्याचा निर्णय महेश साठे यांनी घेतला. एकापाठोपाठ एक अनेक रस्त्यांच्या कामांसाठी निधी येऊ लागला. लक्ष्मी टाकळी उपनगरातील विविध रस्त्यांची कामे त्यांच्या फंडातून होऊ लागली.
येथील प्रतिभाताई परिचारक नगर मधील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते पार पडले. या कामात खडीकरण आणि कॉंक्रीटीकरणाचा समावेश आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित महेश साठे यांचे मोठे बंधू , तथा लक्ष्मी टाकळी गावचे सरपंच संजय साठे, ग्रा.पं. सदस्य त्यांच्या मातोश्री सौ नागरबाई साठे, ग्रा.पं. सदस्य त्यांच्या वहिनी रेश्मा साठे, ग्रा.पं.सदस्य त्यांच्या पत्नी रोहिणी साठे
यांच्यासह ग्रा.पं.सदस्य सोनवणे, सागर कारंडे ,शिंदे सर, कुलकर्णी काका, जाधव सर, कड्डी सर, शिंदे मॅडम, हुसेन तांबोळी ,देवल साहेब, ननवरे साहेब, अकबर आतार, राजू शेख, विटकर, कोकाटे साहेब, नितीन खडतरे, सौरभ नाटिळक, आसबे सर, औदुंबर पोतदार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.