आता मनसेला विजयी करा – राज ठाकरे
दिलीप धोत्रे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची मंगळवेढ्यात सभा

पंढरपूर (प्रतिनिधी)
गेल्या ७५ वर्षात आपण आलटून पालटून फक्त चार पक्षांच्या हातात सत्ता देत आहात, जनतेचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत. आता औषध म्हणून मनसेला विजयी करा, आणि मग पाहा ,आजार कसे पळून जातात ते ? राज्यातील बेरोजगारी, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेला विजयी करा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवेढा येथील जाहीर सभेत केले.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारासाठी या जाहीर सभेचे मंगळवेढा येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांवर कडाडून टीका केली. राज्याला सक्षम नेतृत्व फक्त मनसेच देऊ शकते असा विश्वास उपस्थित नागरिकांना दिला.
मंगळवेढा येथील आठवडा बाजार मैदानात राज ठाकरे यांची जंगी सभा झाली. या सभेस हजारोंच्या जनसमुदायाने गर्दी केली होती. याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्याच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकला. गेली 75 वर्ष राज्यात फक्त चारच राजकीय पक्ष अलटून पलटून राज्य करत आहेत. नागरिकांची बेरोजगारी वाढत आहे, महिलांवर दिवसा बलात्कार होत आहेत.
बेरोजगार युवक व्यसनाधीन होत चालले आहेत. नागरिकांना मात्र दिवस आहे तेच आहेत.
यावर उपाय औषध म्हणून मनसेला विजयी करा, मग बघा कसे आजार पळून जातात ते,
असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अविनाश अभ्यंकर, उमेदवार दिलीप धोत्रे, प्रशांत गिड्डे, अनिल बागल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे. ही ओळख वर्षापासूनची आहे. येथील आमदारांना त्याचे काही देणे घेणे नाही. ते आपला संसार पुणे मुंबई येथे थाटटात . नागरिकांचे त्यांना कोणतेही सोयर सुतक नाही. मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना विजयी करा, आणि मग पहा विकास काही असतो ते, असे सांगून राज ठाकरे यांनी राज्याचा विकास फक्त मनसेच करू शकते , असा विश्वास येथील नागरिकांना दिला.
तर अख्खी गावेच्या गावे सोन्याची झाली असती
भाजपचे आमदार समाधान आवताडे हे
मतदार संघात आपण ४२०० कोटी रुपयांचा निधी आणल्याचे साधन आहेत. इतका निधी आणला असेल तर प्रत्येक गावाला ४० कोटी रुपयांचा निधी येतो. या निधीतून ही गावे सोन्याची झाली असती. येथील आमदार येथील नागरिकांची फसवणूक करत आहेत. दिशाभूल करणाऱ्या या आमदाराला
जनताच धडा शिकवेल, असे उद्गार मनसे नेते आणि उमेदवार दिलीप धोत्रे यांनी काढले.