
महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार
असल्याचा निर्धार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेत बोलून दाखविला.
यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आ.राम सातपुते ,मनसेचे प्रशांत गिड्डे उपस्थित होते.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात आ.राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यानुसार राज्यात विविध ठिकाणी मनसेकडून महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर मेळावे घेण्यात येत आहेत.
यामुळेच पंढरपूरमध्ये हा मेळावा घेण्यात आला आहे.
बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरीही या दोन्ही खासदारांनी संसदेत पाऊल टाकताच पहिले काम करायचे आहे. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तात्काळ उभा करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी मोठे प्रयत्न अवश्यक आहेत, यासाठी दोन्ही खासदारांनी
जोमाने काम करावे असा आशावाद दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मनसेचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.