मुलाच्या आठवणीचे शल्य !
विठुरायास पावणे पाच लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तूचे अर्पण. करमाळा तालुक्यातील वृद्ध दांपत्याचे कृत्य

पंढरपूर (प्रतिनिधी)
मुलाचे अपघाती निधन झाले. त्याच्या हिस्याच्या संपत्तीतून पावणेपाच लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तूचे दान विठ्ठल रुक्मिणी मातेस केल्याची घटना रविवारी पंढरपूरमध्ये घडली आहे.
मौजे हिंगणी ता. करमाळा येथील भाविक सौ. कमल मोहन बाबर,आणि मोहन बाबर असे या वृद्ध दांपत्याचे नाव आहे. त्यांच्या अपघाती निधन झालेल्या मुलाचे नाव कानून मोहन बाबर असे आहे. कानून याचे अपघाती निधन काही दिवसापूर्वीच झाले आहे.कमल मनोहर बाबर या विठ्ठलाच्या अनेक वर्षापासून भक्त आहेत.का नून याच्या हीस्याच्या संपत्तीतून विठुरायाची हीआगळीवेगळी भेट देण्याचा निश्चय त्यांनी केला, आणि पंढरपूर गाठले.
चादीच्या गरुड आणि हनुमंत पताका, असे या वस्तूचे वर्णन असून,याचे वजन ५ किलो ४२५ ग्रॅम इतके आहे. याची किंमत ४ लाख ७७ हजार रुपये इतकी आहे. यात्रा कालावधीत विठुरायाच्या मिरवणुकीवेळी या पताकांचा वापर होणार असून, यामुळे आपला मुलगा कानून हा आठवणीत राहील, अशी श्रद्धा या दांपत्याची आहे.
या चांदीच्या वस्तू अर्पण केल्यानंतर , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने यांचा सन्मान, मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या शुभहस्ते, विठुरायाची प्रतिमा आणि उपरणे देऊन करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी आदी उपस्थित होते.