
पंढरपूर (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९९ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून १३ महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया अशोक चव्हाण यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.
*भाजपच्या यादीत १३ महिलांचा समावेश*
श्रीयजा अशोक चव्हाण – भोकर
अनराधाताई अतुल चव्हाण – फुलंबरी
सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम
सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व
मंदा विजय म्हात्रे – बेलापूर
मनीषा अशोक चौधरी – दहिसर
गोरेगांव – विद्या ठाकूर
माधुरी सतीश मिसाळ – पर्वती
मोनिका राजीव राजले – शेगांव
प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा
नमिता मुंदडा – केज