
पंढरपूर (प्रतिनिधी)
संकट नैसर्गिक असो की कृत्रिम, मनसे नेते दिलीप धोत्रे हे कायमच मदतीला धावताना दिसतात. महिला सबलीकरणाविषयी त्यांचे धोरण तर अचंबित करणारे आहे. अशा या दिलीप धोत्रे यांना पंढरपूरकरांनी लोकप्रतिनिधी बनवावे, असे आवाहन आद्य वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शोभा कराळे यांनी केले. पंढरीत आद्य वीरशैव महिला मंडळ तसेच, मनसे ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून दिवाळीची खरेदी एकाच छताखाली या एक्सपोची उभारणी करण्यात आली आहे. या एक्सपोचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी झाले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मनसे नेते तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप धोत्रे हेही उपस्थित होते.
पंढरपूर शहरात गोरगरिबांना मदत करणारी काही मोजकी मंडळी प्रसिद्ध आहेत . यापैकी एक नाव म्हणजे मनसे नेते दिलीप धोत्रे. गरजू बांधवांना तसेच संकट काळात आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात ते नेहमीच पुढे असतात. कुटुंबातील महिलांचा कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लागावा, यासाठी महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा त्यांचा मानस असतो. यामुळेच दिवाळीची खरेदी एकाच छताखाली, या दिवाळी एक्सपोची उभारणी करण्यात आली आहे.
या एक्सपोमध्ये आद्य वीरशैव महिला मंडळाचाही सहभाग आहे. अनेक स्टॉल असलेल्या या एक्सपोचे उद्घाटन मंगळवारी मोठ्या थाटात पार पडले. याप्रसंगी माजी नगरसेवक मोहम्मद उस्ताद, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, बाबा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
मनसे नेते दिलीप धोत्रे हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे आहेत.
याचा धागा पकडून डॉ. कराळे मॅडम यांनी उपस्थित पंढरपूरकरांना दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
*महिलांना यापुढेही सहकार्य करणार*
या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी निवडणूक असो अथवा नसो, महिला वर्गास मी यापुढेही कायमच मदत करणार असल्याची भावना व्यक्त केली. महिला वर्गानेही आपल्यास बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.