
प्रतिनिधी/पंढरपूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मार्च २०२४ इयत्ता दहावी, या परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी ता. पंढरपूर, या विद्यालयाचा निकाल ९७.९५% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण विद्यालयातून २४४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यावेळी विशेष प्रावीण्य ९८ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ६८ विद्यार्थी, द्वितीयश्रेणी ५२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी मिळवून २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यालयातून प्रथम क्रमांक पासले प्रतीक्षा देविदास ९६.२०%, द्वितीय क्रमांक झांबरे, प्रणाली संजय -९६% , तृतीय क्रमांक निराळी शांभवी नागनाथ -९४.६०% गुण मिळवून यश संपादन केले आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटी अध्यक्ष संभाजी शिंदे, प्राचार्य गायकवाड एन.एम., पर्यवेक्षक रोकडे व मार्गदर्शक विषय शिक्षक तसेच सरपंच रणजित जाधव , उपसरपंच नितीन शिंदे तसेच सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.