
पंढरपूर (प्रतिनिधी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याची घटना बुधवार दि. ३ जुलै रोजी येथील विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास मध्ये घडली.
या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचारी, गुरुवारी काम बंद आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन नित्योपचार वगळता इतर वेळी होणार आहे. शशिकांत पाटील नामक या इसमास विठुरायाने सद्बुद्धी द्यावी, प्रामाणिकपणे काम बजावणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर पुन्हा अशी वेळ येऊ नये, यासाठी शशिकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती , श्री विठ्ठल रुक्मिणी कर्मचारी संघाचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे.