
पंढरपूर (प्रतिनिधी)
लायन्स क्लब पंढरपूरच्या अध्यक्षपदी आरती बसवंती यांनी मागील वर्षी विधायक कामे करून
क्लबच्या यशाची कमान उंचावली आहे. अतिशय उपयुक्त असे प्रोजेक्ट काही अडचणीमुळे अपूर्ण राहिले होते, ते पूर्ण करण्यासाठी समाजातील अनेक दानशूर लोकांनी निधी दिला. त्यामुळे ते सर्व रखडलेले प्रोजेक्ट आरती बसवंती यांनीच पूर्ण करावे, असे अनेक सदस्यांचे मत होते. म्हणून बहुमताने आरती बसवंती यांना, पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
पंढरपूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी फेरनिवड होताच, आरती बसवंती यांनी क्लबचे प्रशासक म्हणून विवेक परदेशी यांचे नाव जाहीर केले. त्यांनी गेल्या वर्षीचे सहकारी संचालक मंडळ कायम ठेवले आहे. यामध्ये सचिवपदी ओंकार बसवंती,
खजिनदार शोभा गुप्ता, प्रथम उपाध्यक्ष सीमा गुप्ता यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
सदर वर्षात पंढरपूर शहरात तीन गरजेच्या ठिकाणी चिल्ड्रन्स पार्क बनवणे, व डायलिसिस मशीनची गरीब रुग्णांसाठी माफक दरात व आवश्यकतेनुसार मोफत सेवा देणे, हा आपला मानस असल्याचे मत, आरती बसवंती यांनी व्यक्त केले आहे.
क्लबमधील जास्तीत जास्त सदस्यांनी या कामी लायन आरती बसवंती यांना सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे. जेष्ठ क्लब सदस्य रा.पा. कटेकर, भारत वाघुले, कैलास करंडे, निर्मला पाटील, मुन्नागीर गोसावी, राजेंद्र शिंदे, राजेंद्र गुप्ता, डॉ.अमित गुंडेवार, डॉ. मनोज भायगुडे यांच्यासह, बहुसंख्य संचालकांनी आरती बसवंती यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंढरपुरातील मान्यवरांनीही सहकार्याचे अभिवचन देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
लायन्स क्लबच्या वरिष्ठांनी, व पंढरपुरातील सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो सार्थ करून दाखवू , तसेच मागील वर्षापेक्षाही मोठी कामगिरी लायन्स क्लबच्या माध्यमातून करून दाखवू, असा मनोदय यावेळी अध्यक्ष आरती बसवंती आणि सचिव ओंकार बसवंती यांनी व्यक्त केला
आहे.