पंढरपुरातील पाटील कुटुंबीयांचे खा. प्रणिती शिंदे यांच्याकडून सांत्वन
डॉ. ऋचा रुपनर आत्महत्या प्रकरण

पंढरपूर (प्रतिनिधी)
पतीच्या त्रासाला कंठाळून
डॉ. ऋचा रुपनर हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली.याप्रकरणी खा. प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी पंढरपूरमधील डॉ. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. ऋचा रुपनर यांच्या आत्महत्येमुळे पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करण्यात यावा, या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन खा. प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिले.
सहा जून २०२४ रोजी सांगोला येथील उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या घरात मोठी लाजिरवाणी गोष्ट घडली. त्यांची सून डॉ. ऋचा रुपनर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात याबाबत डॉ. ऋचा रुपनर यांचा भाऊ ऋषिकेश पाटील यांनी फिर्याद दाखल केली. डॉ. सुरज रुपनर यांच्या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नी डॉ. ऋचा रुपनर यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. यानंतर चार ते पाच दिवस आरोपींना अटक करण्यात आली नाही. यावेळी यावेळी पंढरपूर तालुक्यातील डॉक्टर्स संघटना पोलिसांविरोधात एकवटली. त्यांनी सांगोला येथे जाऊन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी डॉक्टर संघटना आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. याची गंभीर दखल
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी घेतली. मग पोलिसांनी तपास करून डॉ. ऋचा रुपनर हिचे सासरे भाऊसाहेब रुपनर आणि पती डॉ. सुरज रुपनर यास अटक केली.