सामाजिक
सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन
सर्वोच दि. २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान सुनावणी

पंढरपूर (प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांकरिता, २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान लोकअदालत २०२४ सप्ताहाचे आयोजन केले आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे, तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत, अशी माहिती तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष, तथा जिल्हा न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, व ती तडजोडीने मिटवावीत अशी ज्यांची इच्छा असेल, ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात. या लोकदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभागी होऊ शकतात.
जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी, संबंधित वकिलांना कल्पना द्यावी, किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर किंवा तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी तसेच तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी.एन. सुरवसे यांनी केले आहे.