पालखी मार्गावरील अर्धवट कामे जलद पूर्ण करावीत
छावा क्रांतिवीर सेनेचे राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन

पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन. एच. ९६५ हा पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. हा मार्ग पंढरपूरमधून श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाला जोडला जातो. या महामार्गावरील वाखरी ब्रिज ते पंढरपूर कॉलेज चौक दरम्यान काम सुरू आहे. या अर्धवट कामामुळे येत्या आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना मोठा त्रास होणार आहे, तरी हे काम जलद गतीने पूर्ण करावे, धुरळा उडून भाविकांना त्रास होऊ नये याचीही काळजी घेण्यात यावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेकडून करण्यात आली आहे.
छावा क्रांतिवीर सेनेचे राज्य सहसंपर्क प्रमुख गणेश माने यांनी, यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या संचालकांना निवेदन दिले आहे. छावा क्रांतिवीर सेनेने केलेल्या या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटनांनी ही सुरात सूर मिसळला आहे.
पुढील महिन्यातील १७ तारखेला पंढरपूर शहरात आषाढी एकादशी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची तयारी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातप्र शासनाच्या वतीने डोळ्यात तेल घालून केली जात आहे. पंढरपूर शहराच्या प्रवेशद्वारावरचपा लखी मार्गाचे काम अपुरे असल्याने, जिल्हाधिकारी तसेच पालक मंत्र्यांनीही काम तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या आहेत. तरीही हे काम ज्या गतीने सुरू आहे, त्याच गतीने सुरू राहिल्यास आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण होणार नसल्याची खात्री छावा क्रांतिवीर सेनेला आली आहे. यामुळेच या सेनेकडून राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले असून,या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर तसेच पंढरपूरच्या प्रांताधिकार्यांनाही पाठवण्यात आली आहे.
या अपूर्ण कामाचा त्रास आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना झाल्यास, वारकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही, छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.