
पंढरपूर (प्रतिनिधी)
हातात सत्ता असली की, काहीही होऊ शकतं. पूर्वापार नादुरुस्त रस्त्यांचही भाग्य उजडतं. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील दोन रस्त्यांना अनेक वर्षानंतर जीवदान मिळालं आहे. शिवसेना नेते महेश साठे यांची खुद्दारी या रस्त्याच्या कामी आली आहे. अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेले हे रस्ते, जिल्हा नियोजन मंडळातून निधी देऊन, या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभही महेश साठे यांच्याच हस्ते पार पडला आहे. नियोजन मंडळाचे सदस्य महेश साठे यांनी केलेल्या या कामाबद्दल, कोर्टी परिसरातून मोठे कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांची काही वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. नियोजन मंडळावर नेमणूक होताच त्यांनी गादेगाव,बोहाळी,कोर्टी, उंबरगाव, सोनके, तपकिरी शेटफळ आणि लक्ष्मी टाकळी आदी गावातील विकास कामांना निधी देण्याचे काम प्राधान्याने केले आहे. म्हणूनच या परिसरातील नागरिक
त्यांच्यावर जाम खुश आहेत.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील १०-१० लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या शुभहस्ते रविवारी पार पडला. मुसलमान येडगे वस्ती ते जुम्मा शेख वस्ती आणि मुसलमान येडगे वस्ती ते लायकाली शेख वस्ती, या दोन रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या रस्त्यामुळे येथील ४०० ते ५०० नागरिकांची सोय होणार आहे. हे नागरिक गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यांच्या प्रतीक्षेत होते.
या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी कोर्टी गावचे सरपंच
राजाभाऊ पवार, माजी तथा सदस्य उपसरपंच महेश येडगे, ग्रामपंचायत सदस्य बबलू शेख, शरीफभाई शेख, विजय काळे, हरुण मुजावर, अनवर मुजावर, सोहेल मुजावर, महमूद शेख, राजाभाई शेख यांच्यासह कोर्टी गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.