
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची रणनीती ठरवण्यासाठी विठ्ठल परिवाराने घेतलेल्या बैठकीत भगीरथ भालके यांची तोफ जोरात खणाणली. सध्या चाललेल्या राजकारणावर त्यांनी सडकून टीका केली. सर्वच विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवार आजही अभेद्य आहे याची साक्ष देण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात विठ्ठल परिवाराच्या बैठका घेण्यात आल्या. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी येथील दाते मंगल कार्यालयात जाहीर सभा पार पडली. या सभेत
विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी विरोधकांचा समाचार घेतला. या सभेसाठी मतदार संघातील २२ गावातून हजारो नागरिक उपस्थित होते.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या नावाचा वापर करून काही मंडळी मतदार संघात दारोदार फिरत आहेत. याचेवेळी विठ्ठल परिवारातील अनेक मंडळी आपल्या पाठीशी आहेत. कै. भारत भालके यांचे आपणच खरे वारसदार आहोत,असा प्रचार मतदारसंघात करत आहेत यावर बोलताना भगीरथ भालके यांनी, विठ्ठल परिवार आपणच जिवंत ठेवला म्हणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, विठ्ठल परिवाराचे नाव घेऊन आजवर आपणच जिवंत राहिला आहात.
सौ चुहे खाके बिल्ली चली हाज अशी टिपणी केली.
याचवेळी सध्याचे आमदार समाधान अवताडे यांच्यावरही जोरदार अल्ल चढवला. हजारो कोटी रुपयांची विकास कामे मतदार संघात आणली, असे म्हणणाऱ्यांनी मतदार संघात फिरून पहावे. किती कामे झाली, याचा त्यांना अंदाज येईल, या शब्दात समाचार घेतला.