
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील आदर्श बाल व प्राथमिक मंदिर या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला.मराठी , कन्नड आणि तेलगू गीतांच्या ठेक्याने विद्यार्थ्यांसह प्रेक्षकवर्गही खुश झाला.
सध्याचा हंगाम हा स्नेहसंमेलनाचा हंगाम आहे.
विविध शाळांच्या वतीने स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम पार पडत आहेत. पंढरपूर शहरातील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श बाल व प्राथमिक मंदिर , या शाळेचा स्नेहसंमेलन कार्यक्रम दि.९ आणि १० जानेवारी रोजी पार पडला. या स्नेहसंमेलनात मराठी , कन्नड आणि तेलुगु गीते सादर करण्यात आली. या गाण्यांतील मनमोहक संगीत आणि ठेक्यावर सादरकर्त्यांसह प्रेक्षकही डोलू लागले.
खंडोबारायाचं येड बाई लागलं या
गाण्यातील सादरीकरण आणि दृश्य सजावट यामुळे प्रेक्षकांना जणू काही गडावरच असल्याचा भास होत होता. बाईपण भारी , दैवत छत्रपती , मी आले मल्हार मल्हार , लल्लाटी भंडार इ. ६० पेक्षा अधिक गाण्यांचं सादरीकरण या कार्यक्रमात झाले.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माया सांगोलकर, रजनी देशपांडे , वर्गशिक्षिका अन्नपूर्णा धायगोंडे, नीता तरळगट्टी , सुजाता कुलकर्णी, सोनाली आगावणे, सुवर्णा सपकाळ , सुरेखा शिंदे, संगीता कोकणी , दळवी मॅडम यांच्यासह सर्व सहशिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा मुंडे आणि आशा पाटील यांनी केले.