Uncategorized

ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ

२४ तासात थंडी आणखी कमी होणार

पंढरपूर (प्रतिनिधी)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घटलेलं किमान तापमान आता ढगाळ वातावरणामुळे वाढू लागलंय. त्याच्यात मराठवाडा मध्य व उत्तर महाराष्ट्र आणि कोकणमध्ये पावसाला पोषक स्थिती तयार झाल्याने हवामान ढगाळ आहे. गारठा कमी झालाय. तापमानात वाढ होत असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर नोंदवला जात आहे. येत्या दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवलं आहे.

बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला चक्राकार वारे सक्रिय झाल्या असून , राजस्थान आजूबाजूच्या भागापासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान चढउतार होत आहे. हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब हरियाणामध्ये प्रचंड गारठा वाढलाय. दाट धुक्याची चादरही पाहायला मिळत आहे.

*हवामान विभागाचा अंदाज काय?*

राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाल्याने ढगाळ वातावरण आहे. परिणामी किमान तापमान वाढला आहे. येत्या २४ तासात थंडीचा जोर कमी होणार असून किमान तापमान ३ ते ६ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात किमान तापमानाची सामान्य तापमानाहून १ ते ३ अंशांनी अधिक नोंद झाली. राज्यात येत्या दोन दिवसात पावसाला पोषक हवामान तयार झालं असून विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला जपण्याचा सल्ला प्रादेशिक हवामान केंद्राने दिलाय.

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तर कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. किमान तापमान येत्या दोन दिवसात हळूहळू वाढणार असून दोन ते तीन अंशांनी त्यात वाढ होणार आहे. विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा सांगण्यात आलंय .पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांचा समन्वय होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून सध्या वातावरणात असलेला गारठा काहीसा कमी होणार आहे. किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा सांगण्यात आलंय .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close