
माढा (तालुका प्रतिनिधी )
ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त लेखणी, डायरी,गुलाब पुष्प व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेंबळे येथील जेष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी हे होते.
सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. सदर प्रश्नांची निरसन सुहास कांबळे, गणेश पोळ यांनी केले. संस्थेचे संस्थापक प्रा. हरिचंद्र गाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी टेंभुर्णीतील पत्रकारांच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्याबद्दल व पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुकुंद रामदासी, सदाशिव पवार, अमरसिंह शेंडे, गणेश चौगुले, सुहास कांबळे, संतोष वाघमारे, सुहास साळुंखे, संतोष पाटील, विष्णू बिचकुले, महावीर वजाळे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील सृष्टी सोनवणे, शर्वरी यादव, अश्विनी जाधव, गौरी नागणे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना कॉर्डिनेटर धनंजय भोसले यांनी केली. सर्वांचे आभार संस्थापक हरिचंद्र गाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता नववी, दहावीतील सर्व मुले व मुली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष लोक सह्याद्रीचे संपादक अमरसिंह शेंडे, ज्येष्ठ पत्रकार सदाशिव पवार, सुहास साळुंखे, संतोष पाटील, संतोष वाघमारे, गणेश पोळ, सुहास कांबळे, सिद्धेश्वर शिंदे, धनंजय भोसले, गणेश चौगुले, परितेचे राजेश शेळके, दत्तात्रय सुरवसे, सोमनाथ निर्धार, सतीश काळे, विष्णू बिचकुले, सुरज देशमुख, गणेश भोसले, सचिन जगताप, विकास श्रीखंडे इत्यादी पत्रकार व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.