संकटात शोधली संधी , संधीचं केलं सोनं !
पंढरीतील डॅशिंग युवतीचा कमलीवाले यांच्याकडून सन्मान

पंढरपूर (प्रतिनिधी)
संकटाला घाबरणारे आणि त्याचा बाऊ करून असणारे आणि संकटापासून पळ काढणारे अनेक लोक समाजात असतात. परंतु संकटालाच सामर्थ्य बनवून त्यालाच आपल्या जीवनाचे कवच बनवणारे काही सुज्ञ लोकही समाजात आहेत. यापैकीच एक पंढरपूर शहरातील युवती माधुरी धोत्रे . यांचा पंढरीतील समाजसेवक मुजम्मील कमली वाले यांच्याकडून नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानातूनच त्यांची यशोगाथा पुढे आली.
माधुरी धोत्रे आणि संजय धोत्रे हे पंढरीतील दांपत्य , अगदी सामान्य कुटुंबातील. माधुरी धोत्रे यांना शरीराच्या काही व्याधी होत्या. त्यांना हरबल लाईफचे न्यूट्रिशन मिळाले. त्यांचा आजार हळूहळू दूर झाला. एकदम खटाखट झालेल्या माधुरी धोत्रे यांना साक्षात्कार झाला. समाजात असे अनेक आजारी लोक आहेत, जे व्याधींनी ग्रस्त आहेत. दवाखाने करून दमले आहेत. या हरबल लाईफच्या न्यूट्रिशनचा प्रयोग त्यांच्यावर करून त्यांना बरे केले तर , आपल्याही कौटुंबिक परिस्थितीत फरक पडेल , असा विश्वास मनाशी बांधून त्या कामाला लागल्या. पती संजय धोत्रे यांना येथील कराड चौकात हरबल लाईफचे सेंटर खोलून दिले. आणि त्यांचा प्रवास सुरू झाला.
वेगवेगळ्या व्याधींच्या लोकांना
सेंटरमध्ये आणायचे. विश्वास देऊन हे न्यूट्रिशन त्यांना द्यायचे. यासोबत हलकाफुलका व्यायामही करून घ्यायचा. हळूहळू लोक येत गेले. अनेक लोकांच्या व्याधी बऱ्या झाल्या. माधुरी धोत्रे यांच्या सोबत त्यांची टीम बनू लागली. पती संजय धोत्रे हे डीजे ऑपरेटिंग चा व्यवसाय करत होते. त्यांचेही वजन एका जागी बसून भरपूर वाढले होते. या न्यूट्रिशन मुळे त्यांचेही वजन कमी झाले. आता दररोज सकाळी तेच रुग्णांचा व्यायाम करून घेत असतात.
अनेक लोकांना सकाळी लवकर उठू वाटत नाही. माधुरी धोत्रे सकाळी प्रत्येकाला कॉल करून
जागे करण्याचे काम करतात. थंडीतही घाम निघेपर्यंत व्यायाम करून घेतात. यामध्ये प्राणायाम आणि योग इत्यादींचा व्यायामही घेतला जातो. ज्यांना घाम निघत नाही त्यांच्याकडे , माधुरी धोत्रे जातीने लक्ष देतात. आता
त्यांच्यासोबत त्यांच्या टीम प्रमुख ज्योती गुरव, पुनम माळी, सागर धोत्रे, संजय धोत्रे, तुळसा धोत्रे आणि अरुणा चौगुले हे एकदिलाने काम करत आहेत.
अशा या पंढरपूर नगरीतील धाडसी युवती माधुरी धोत्रे यांचा सन्मान पंढरीतील प्रसिद्ध समाजसेवक कमलीवाले यांच्याकडून करण्यात आला.
आणि माधुरी धोत्रे यांचे कार्य प्रकाश झोतात आले