राजकिय

चढाओढीचा विषय आला लिफ्ट वर

अधिवेशनाचा पहिला दिवस लिफ्टमुळे गाजला

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकाच लिफ्टमध्ये शिरले. त्यांनी एकमेकाचा कानोसाही घेतला. या प्रकरणामुळे मंत्रिमंडळात मोठी चर्चा रंगली. परंतु ही लिफ्ट मुख्यमंत्री यांचे जिथे कार्यालय आहे, त्या सहाव्या मजल्यावर जाणार नाही, त्यांनी अगोदरच
काँग्रेसला लिफ्ट दिली आहे, म्हणून तर आम्ही
जनतेच्या लिफ्टमध्ये विराजमान झालो आहोत, अशी मुश्किल टिपण्णी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावेळी नार्वेकर ही त्यांच्याबरोबर होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काहीतरी औपचारिक चर्चा झाली.या चर्चेची मोठी चर्चा मंत्रिमंडळात होऊ लागली.

लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड केली होती. लोकसभा निवडणुकीत
झालेल्या आगपाखडीचे परिणाम अधिवेशनात पहावयास मिळतील, असे चित्र असताना,
मंत्रिमंडळातील या लिफ्ट मुळे वेगळीच चर्चा रंगू लागली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी मिश्किल टिपण्णी केली. मुख्यमंत्री यांचे कार्यालय ज्या सहाव्या मजल्यावर आहे, तिथपर्यंत ही लिफ्ट पोहोचू शकणार नाही. त्यांनी अगोदरच काँग्रेसला लिफ्ट दिली आहे. म्हणून तर आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये विराजमान झालो आहोत , अशा प्रकारचे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. नऊ खासदार निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले. यामुळे उद्धव ठाकरे काहीसे नाराज आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची या निवडणुकीत दाणादाण उडाली. त्यांना फक्त सतरा खासदार निवडून आणता आले. याचा परिणाम राज्यासह केंद्र सरकारवरही झाला. राजकारणात काहीही घडू शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी सावध पावले उचलायला सुरुवात केली आहे. पुन्हा जय विरूची जोडी नागरिकांसमोर आली तर नवल वाटायला नको.
मंत्रिमंडळातील लिफ्टच्या या प्रसंगाने पुन्हा एकदा
हे दोन्ही नेते एकत्र येतील काय ? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close