पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरमधील शिक्षण संस्थांचा ज्यावेळी विषय निघतो, त्यावेळी स्वेरी इंजीनियरिंग कॉलेजचे नाव सर्वप्रथम ओठावर येते. राज्य सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वेरी कॉलेजकडून जोरदार स्वागत करण्यात आले. याचवेळी कॉलेजकडून कॅम्पसमध्ये या निर्णयाबाबत घडलेल्या घटनांना उजाळाही देण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्या काळात २०२३ साली, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूरमधील स्वेरी कॉलेजला भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी वर्गाबरोबर हितगुज केले होते.येथील विद्यार्थिनींना पाहून त्यांनी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या मनातील एक गोष्ट बोलून दाखवली होती. राज्यातील मुलींसाठी शिक्षण मोफत करण्याची
त्यांची मनीषा होती. याच अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वेरी कॅम्पसमध्ये बोलून दाखवलेल्या त्यांच्या निर्णयाची आठवण झाली. महिला सबलीकरण करण्यासाठी, राज्य सरकारने घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत स्वेरी कॅम्पसकडून करण्यात आले आहे. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे कौतुक केले आहे.