राजकिय

अवताडे शुगरकडून प्रति टन २८०० रुपयांचे उस बिल खात्यावर जमा

चेअरमन संजय अवताडे यांनी दिली माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आ. समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या,
अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदुर या साखर कारखान्याचा गळित हंगाम सुरू आहे. चालू गळीत हंगामातील ३० नोव्हेंबरपर्यंतच्या उसाचे बिल २८०० रुपये प्रति टन याप्रमाणे शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची, माहिती चेअरमन संजय अवताडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

याप्रसंगी मंगळवेढा बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, भारत निकम, सरव्यवस्थापक सुहास शिनगारे,मोहन पवार, संभाजी फाळके, बजरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, तोहीद शेख, दामोदर रेवे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेअरमन संजय अवताडे यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या फॅबटेक समूहातून हा कारखाना खरेदी करून ,अवताडे उद्योग समूहाने घेतला. या कारखान्याचा तिसरा गळित हंगाम सुरु असून कारखान्याची वाटचाल व्यवस्थित सुरू आहे. आम्ही हा साखर कारखाना केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असून , या कारखान्यातून आम्ही कोणताही स्वार्थ ठेवला नाही. आतापर्यंतच्या गळीत हंगामामध्ये कारखान्याचे सर्व कर्मचारी ऊस वाहतूकदार, ऊसतोड मजूर व कारखाना प्रशासनाने मन लावून आणि प्रामाणिक काम केल्यामुळे, मागील दोन्ही गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडले आहेत. यावेळीही असेच सहकार्य सर्व कर्मचारी ऊस पुरवठादार ऊस उत्पादक हे करीत असून, आज अखेर दोन लाख मॅट्रिक टन केले आहे. गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा कारभार करून , शेतकऱ्यांच्या विकासाला पात्र राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत , तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपला ऊस अवताडे शुगरला घालून सहकार्य करावे ,असे आवाहनही चेअरमन संजय अवताडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close