
पंढरपूर (प्रतिनिधी)
विठुरायाच्या आषाढी सोहळ्यात ,धनगर समाजाने कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन करू नये, समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, आपण सरकारशी यशस्वी मध्यस्थी करू, असा विश्वास धनगर समाजातील आंदोलकांना आ. समाधान अवताडे यांनी दिला आहे.
धनगर समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, समाज आक्रमक झाला आहे. आषाढी सोहळ्यासाठी पंढरीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना व्हीआयपी गेटसमोर
शेळ्या मेंढ्यांसह घेराव घालण्याचा इशारा, धनगर समाज बांधवांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन
स्थानिक आमदार म्हणून, समाधान अवताडे यांनाही देण्यात आले. यावेळी या आंदोलकांशी आ. अवताडे यांनी चर्चा केली.
धनगर समाजाच्या अनेक जुन्या आणि नव्या मागण्या, आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांच्या कानावर घालू. मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि यावर तोडगा काढण्यासाठी, सरकारला विनंती करणार आहे. या मागण्या संदर्भात आमदार म्हणून आपण यशस्वी मध्यस्थी करू, धनगर समाजाने आषाढी यात्रेदरम्यान हे आंदोलन करू नये, असे आवाहन आ. अवताडे यांनी या आंदोलकांना केले आहे.या आंदोलनामुळे आषाढी वारीसारख्या मोठ्या सोहळ्याला गालबोट लागणार आहे. आषाढी सोहळा यशस्वी करण्यासाठी धनगर समाज बांधवांनी सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे.
*आंदोलनांची संख्या कमी झाली*