
पंढरपूर (प्रतिनिधी)
यंदाची आषाढी वारी सर्वार्थाने गाजत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ,राज्य सरकार
भाविकांवर फिदा आहेत. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. याचवेळी कोणताही धाक नसल्याने, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही मनापासून काम करणे सुरू केले आहे. याचाच परिणाम म्हणून, पंढरीत नवनवीन संकल्पना राबण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
परवाच विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी
आषाढी यात्रेतील पालखी तळ आणि इतर ठिकाणांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह पंढरीतील प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी
विठुरायाच्या दर्शनाबाबत नवीन संकल्पना मांडली.
पुढील कार्तिकी यात्रेत टोकन दर्शन पद्धत सुरू करण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.