
पंढरपुर (प्रतिनिधी)
आषाढी एकादशीची वारी पोचवण्यासाठी पंढरीकडे जाणाऱ्या भाविकांना दिलासा देण्याचे काम
पंढरपूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी केले असून, त्यांच्या या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे.
आषाढी एकादशी दिवशी टेंभुर्णी पंढरपूर रोड भाविकांनी गजबजून गेला होता. पंढरीची पायी वारी करण्यासाठी या रस्त्यावर भाविकांची रीघ लागली होती. या भाविकांच्या चहा ,पाणी चहा पाणी आणि फराळाची सोय रस्त्यावर जागोजागी करण्यात आली होती. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी भोसे पाटी येथे भाविकांना फराळाचे वाटप केले. केळी आणि बटाटा वेफर्सची पाकिटे भाविकांना पुरवण्यात आली. पॅकेजिंग अन्नाचे भाविकांनी मन भरून कौतुक केले. भाविकांनी रांगेत उभा राहून, ही पाकिटे स्वीकारली.